Ad will apear here
Next
वऱ्हाडी लोकगीतांचा चिकित्सक अभ्यास
लोकगीतांची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. लिखितपेक्षा याचे स्वरूप मौखिक असते. लोकगीतांमधून लोकजीवनाचे, संस्कृतीचे प्रतिबिंब पडते. त्यामुळे लोकगीतांमधून संस्कृती व समाजाचा अभ्यास करणे शक्य होते. प्रतिमा इंगोले यांनी वऱ्हाडी लोकगीतांच्या आधारे वऱ्हाडी समाजजीवनाचा अभ्यास केला. ‘वऱ्हाडी लोकगीतांचा चिकित्सक अभ्यास’मधून त्यांनी याचे महत्त्व स्पष्ट केले आहे.

लोकगीताचे स्वरूप व वैशिष्ट्ये सांगताना त्यांनी ‘लोकसाहित्य’ या शब्दाची फोड करून वऱ्हाडी भाषेतील त्याचे अस्तित्त्व सांगितले आहे. लोकगीत म्हणजे काय, त्याची व्याप्ती-व्याख्या, लोकगीत व लौकिकगीताचे स्वरूप व भेद, लोकगीत व स्त्रीजीवन, पूर्वपरंपरा, लोकगीत व लोकभाषा, लोकगीताची आविष्कार शैली विशद केली आहे. 

पुढे वऱ्हाडी लोकगीतांचे लग्नगीत, डहाकागीते, पाळणा गीते, अंगाई गीते, भुलाई गीते आदी ठळक प्रकार यात असून, त्याबद्दल निष्कर्षही दिले आहेत. लोकगीतातून घडणारे समाजदर्शन, सांस्कृतिक दर्शन यातून घडविले आहे. 

पुस्तक : वऱ्हाडी लोकगीतांचा चिकित्सक अभ्यास
लेखक : डॉ. प्रतिमा इंगोले
प्रकाशक : सोनल प्रकाशन
पाने : ३०४
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZHDCB
 Valuable addition to the studies of traditnal , folklore-type literature.
They are important for the studies of societies , communities and
regions . Librarians -- please note . To store and preserve such
literature is your area of responsibity .o
 पुस्तक समाभिमुख उपयुक्त असे आहे.
Similar Posts
बोडखी ‘बोडखी’ या कादंबरीचा अल्प परिचय...
नक्षलग्रस्त महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा, जिल्ह्यांत नक्षलवादाने चांगलेच पाय रोवले आहेत. नक्षलवाद म्हणजे नेमके काय, त्याचे मूळ स्वरूप व सध्याची वाटचाल, आदिवासी जनतेवर होणारे अत्याचार याचे दाहक चित्रण प्रतिमा इंगोले यांनी ‘नक्षलग्रस्त’ या कादंबरीतून केले आहे.
बोलू ‘बोली’चे बोल! - वऱ्हाडी बोली - डॉ. प्रतिमा इंगोले (व्हिडिओ) २०१९ या आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने काही बोलीभाषांचा वेध घेणारा ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा उपक्रम राबवला होता. लॉकडाउनच्या काळात वेळ हाताशी असताना रसिकांना बोलीभाषांचा गोडवा अनुभवता यावा, म्हणून बोलीभाषांच्या व्हिडिओची मालिका पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. त्या मालिकेत
अभंग : स्वरूप आणि चिकित्सा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अभंग हाही एक भाग आहे. अभंग हा जसा आध्यात्मिक जीवनाचा एक भाग आहे, तसाच सामाजिक जीवनाचाही. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांच्या अभंगवाणीने अवघा महाराष्ट्र घडवला. प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांनी या पुस्तकात अभंगाचे स्वरूप सांगून चिकित्सा केली आहे. संतांची

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language